Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपेपरफुटी प्रकरणी रद्द झालेली 'नीट' ची परीक्षा पुढील महिन्यात.. - परीक्षेसाठी भरलेली...

पेपरफुटी प्रकरणी रद्द झालेली ‘नीट’ ची परीक्षा पुढील महिन्यात.. – परीक्षेसाठी भरलेली फी मिळणार परत; परीक्षेच्या वेळेतही १५ मिनिटांची वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट यूजी-२०२६'(NEET-UG)ची परीक्षा नुकतीच ३ मे २०२६ रोजी देशभरातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमधील ५ हजार ४०० हून अधिक केंद्रांवर २२ लाखांहून अधिकच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.मात्र,परीक्षेतील पेपरफुटीच्या संशयावरून १२ मे २०२६ रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.त्यानुसार,सध्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)अत्यंत वेगाने करत असून याप्रकरणी आतापर्यंत सात जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सीबीआयने पाच मुख्य आरोपींना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर केले.यामध्ये राजस्थानचे मंगीलाल बिनवाल, दिनेश बिनवाल आणि विकास बिनवाल,तर हरियाणातील गुरुग्रामचा यश यादव आणि महाराष्ट्रातील नाशिकचा शुभम खैरनार यांचा समावेश आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने या सर्व पाचही आरोपींना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातही सापडले असून,सीबीआयच्या पथकाने पुण्यातून मनीषा वाघमारे या ब्युटिशियनला,तर नाशिकमधून धनंजय लोखंडे यालाही अटक केली आहे. अश्यातच आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने(NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट यूजी-२०२६’ परीक्षेच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.आता ही पुर्नपरीक्षा येत्या,रविवार २१ जून २०२६ रोजी पार पडणार आहे.नव्याने होणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि त्यांच्यावर मानसिक किंवा आर्थिक ताण पडू नये, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांनी जाहीर केल्यानुसार,या पुर्नपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. उलट,आधी भरलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहे.त्याचबरोबर,नव्याने अर्ज करण्याची गरज राहणार नाही,तर जुनेच अर्ज ग्राह्य धरले जातील.
याव्यतिरिक्त,विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रासाठी नव्याने शहराची निवड करण्याची विशेष मुभा दिली जाईल.विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षेच्या वेळेतही १५ मिनिटांची वाढ करण्यात आली असून,आता ही परीक्षा दुपारी २ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल.या परीक्षेची नवीन प्रवेशपत्रे १४ जूनपर्यंत अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!