Monday, October 26, 2026
Homeगडचिरोलीरानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त दुर्गम भाग असल्यामुळे ग्रामस्थांनी जखमींला कावडीवरून मुख्य रस्त्यापर्यंत आणले होते.जिथे १०२(लाहेरी)आणि १०८ क्रमांकाच्या दोन्ही रुग्णवाहिका आधीच उपस्थित होत्या.रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता जखमींला ताब्यात घेतले आणि तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात भरती केले.प्रशासनाच्या या जलद प्रतिसादामुळे जखमीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
  • गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकट👇
गडचिरोली जिल्ह्यात १०२ आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका तातडीच्या सेवेसाठी सज्ज आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध व्हावी,यासाठी जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने रुग्णवाहिकांचे जाळे अधिक भक्कम करण्यात आले आहे.जिल्ह्यात सध्या १०२ आणि १०८ या दोन्ही आपत्कालीन सेवांच्या रुग्णवाहिका मोठ्या संख्येने कार्यरत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुहास गाडे यांनी दिली.
  • प्राथमिक आरोग्य स्तरावर रुग्णवाहिकांचे नियोजन👇
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार,ग्रामीण स्तरावर आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका ६६ उपलब्ध आहेत.याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC): जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ५२ रुग्णवाहिका तैनात आहेत.
प्राथमिक आरोग्य पथक (PHU): दुर्गम भागातील पथकांसाठी १४ रुग्णवाहिकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.या रुग्णवाहिका प्रामुख्याने गरोदर माता,बालके आणि ग्रामीण भागातील रुग्णांना विनामूल्य सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत.
रुग्णालय स्तरावरील उपलब्धता:
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी आरोग्य विभागाच्या सज्जतेबाबत माहिती देतांना सांगितले की,जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची विशेष सोय आहे.ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,सामान्य रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय अशा प्रमुख आरोग्य संस्थांमध्ये मिळून एकूण ४१ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.या रुग्णवाहिकांमुळे गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या शहरात हलवणे सुलभ झाले आहे.
१०८ आपत्कालीन सेवा:
वरील रुग्णवाहिकांशिवाय,अपघाती घटना किंवा अत्यंत गंभीर वैद्यकीय आणीबाणीसाठी जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या १० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिका अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालीने (Life Support)युक्त असून त्या संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.यात
ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट एकूण २ रुग्णवाहिका आहेत. उपजिल्हा रुग्णालय अहेरी,कुरखेडा बेसिक लाईफ सपोर्ट जिल्ह्यात एकूण ८ उपलब्ध आहेत.
प्रशासनाचे आवाहन: जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा रुग्णवाहिकेच्या गरजेसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा किंवा १०८ क्रमांकावर कॉल करावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी केले आहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास तत्पर आहे,असेही आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!