Friday, October 2, 2026
Homeगडचिरोलीअसे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क...

असे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क व्याजाने दिले वाटून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासन स्तरावरून गावगाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यात येते.मात्र,काही लोकसेवक मनमर्जिने कामे करून घरचीच खेती असल्याचे समजतात आणि शासकीय निधीवर डल्ला मारण्याचे काम करतात.पण, निलंबित ग्रामसेविकेचा गजबचा कारनामा कुरखेडा तालुक्यात उघडकी आला आहे.शासनाकडून मिळालेला निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क गावातील काही इसमांना व्याजाने दिल्याचे समोर आले आहे. प्रकरणी चौकशी अंती ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेविका रोशनी सहारे यांना गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
रोशनी सहारे ह्या कुरखेडा तालुक्याच्या चिखली ग्रामपंचायतीत कार्यरत असतांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत २०१५-२०१६ या वर्षात ‘गौण वनोपज उपभोग’ योजनेंतर्गत बीज भांडवल म्हणून १२ लाखाचा निधी प्राप्त झाला होता.यात चिखली गावाला ८ लाख रुपये,तर चिचटोला गावाला ४ लाख असा एकूण १२ लाखांचा निधी विकासकामांसाठी देण्यात आला होता.मात्र,सहारे यांनी विकास कामे न करता शासकीय निधीचा गैरवापर करत तो निधी चक्क व्याजाने वाटला.प्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार केली.तक्रारीनंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली.चौकशी अहवालात आर्थिक अनियमितता स्पष्ट होऊन पदाचा दुरुपयोग व नियमांना हरताळ फासून तब्बल १२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेचे सीईओ गाडे यांनी रोशनी सहारे यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले.
  • सीईओ सुहास गाडे यांचे आदेश👇
रोशनी सिध्दार्थ सहारे,ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत चिखली,पंचायत समिती कुरखेडा यांनी आपल्या नियत कर्तव्यात कसूर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम व १९६७ चे नियम ३ चा भंग केलेला आहे.त्यामुळे श्रीमती रोशनी सिध्दार्थ सहारे,ग्रामपंचायत अधिकारी,ग्रामपंचायत चिखली, पंचायत समिती कुरखेडा यांचेकडील ग्रामपंचायत चिखली येथे दप्तराची सखोल तपासणी करण्याकरिता व त्यांनी तपासणीकामी अडथळा आणु नये म्हणुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा(शिस्त व अपील)नियम १९६४ मधील ३(१)(अ)नुसार याव्दारे तात्काळ निलंबित करण्यांत येत आहे.श्रीमती रोशनी सिध्दार्थ सहारे यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय पंचायत समिती, गडचिरोली येथे ठेवण्यात येत असून,त्यांना कार्यालय प्रमुखाचे पुर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी ४३ वर्षीय शिक्षक...

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!