Sunday, October 4, 2026
Homeनागपूरमहिलेने एसडीओ अन् तहसीलदाराला शिकवला धडा; ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश..

महिलेने एसडीओ अन् तहसीलदाराला शिकवला धडा; ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून शासकीय कार्यालय आपल्याच घरची खेती असल्याचे मानतात.पण,शासकीय कार्यालय हे  जनतेच्या कामासाठी आहे व त्या ठिकाणी बसलेला प्रत्येक अधिकारी,मग तो कितीही मोठा कां असेना,तो शासनाचा नोकर व जनतेचा लोकसेवक आहे.मात्र,अनेकजण आपल्या पदाचा रोप झाडून सर्वसामान्य नागरिकांना मी अधिकारी आहे,त्यामुळे आमचे कोण काय करू शकतो?अश्या भ्रमात जाऊन मनमर्जिने कामे करू पाहतात. अश्याच प्रकारे नागपूर जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व ढिसाळ कारभारामुळे
 सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा एक प्रकार समोर आला आहे.शासकीय प्लॉट प्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेऊन एका महिलेने एसडीओ अन् तहसीलदाराला चांगलाच धडा शिकवला आहे. प्रकरणी नागपूरच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रामटेकचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ)व पारशिवनीचे तहसीलदार यांना दणका देत प्रकरणातील पिडीत महिलेला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासासाठी ४० हजार रुपये तसेच तक्रारीच्या खर्चासाठी १० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,वैशाली शंकरराव भोगे रा.पारशिवनी,जि.नागपूर यांनी शासनाकडून प्लॉट मिळावा यासाठी पारशिवनी तहसील कार्यालयात अर्ज केला होता.अर्जानुसार त्यांना २३९ क्रमांकाचा प्लॉट मंजूर झाला होता.त्यासाठी त्यांनी २ एप्रिल २००५ रोजी १ हजार ९१४ रुपये भरले होते. मात्र,तहसीलदार पारशिवनी यांनी त्यांना प्लॉटची ताबा पावती दिली नाही. ताबा पावती न दिल्याने प्लॉटवरील घर बांधकामात अडथळा निर्माण झाला.यामुळे वैशाली भोगे यांनी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी ताबा पावतीसाठी लेखी अर्ज दिला.त्यानंतरही त्यांनी अनेकदा तहसील कार्यालयाच्या चकरा मारल्या.पुढे २० सप्टेंबर २०२२ रोजी त्या उपविभागीय अधिकारी रामटेक व तहसीलदार पारशिवनी कार्यालयात अर्ज घेऊन गेल्या असता,संबंधित अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार देत त्यांना परत पाठविले.उलट २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांना प्लॉट शासन जमा करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.यात ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ झाल्याचे लक्षात येताच भोगे यांनी तत्कालीन तहसीलदार रणजित दुसावार व जिल्हाधिकारी नागपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवून नागपूरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली.त्यावर, आयोगाचे अध्यक्ष सतीश सप्रे,सदस्य मिलिंद केदार व सदस्या शीतल पेटकर यांनी कागदपत्रांची तपासणी करून पिडीत महिलेच्या बाजूने निर्णय दिला व रामटेकचे उपविभागीय अधिकारी(एसडीओ)व पारशिवनीचे तहसीलदार यांना तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासासाठी ४० हजार रुपये तसेच तक्रारीच्या खर्चासाठी १० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!