Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीकुरखेड्यात नवीन बस डेपो उभारणीसह विविध मुद्द्यांवर आमदार मसरामांची बैठक संपन्न..

कुरखेड्यात नवीन बस डेपो उभारणीसह विविध मुद्द्यांवर आमदार मसरामांची बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात स्वतंत्र बस डेपो उभारण्यात यावा,तसेच कुरखेडा-नागपूर आणि कोरची-नागपूर बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली. यासंदर्भात आज,बुधवार २५ फेब्रुवारीला झूम मीटिंगद्वारे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व जिल्हाधिकारीयांच्या अधक्षतेखाली बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)अंतर्गत कुरखेडा येथे बस डेपोची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नागपूर येथे शिक्षण, आरोग्य व शासकीय कामांसाठी जावे लागते.मात्र,थेट बससेवेअभावी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार मसराम यांनी निदर्शनास आणून दिले.
कुरखेडा-नागपूर तसेच कोरची-नागपूर या थेट बसफेऱ्या सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना,रुग्णांना व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,असेही त्यांनी सांगितले.याशिवाय मानव विकास अंतर्गत सुरू असलेल्या बससेवा नियमित व सुरळीत ठेवण्याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या.बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवून प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याचे आश्वासन दिले.लवकरच या मागण्यांवर ठोस निर्णय होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!