Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी तालुक्यात बस्तान मांडलेल्या जंगली हत्तींचा शिरकाव कुरखेडा तालुक्यात..

आरमोरी तालुक्यात बस्तान मांडलेल्या जंगली हत्तींचा शिरकाव कुरखेडा तालुक्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून बस्तान मांडलेल्या जंगली हत्तींनी कुरखेडा तालुक्यात शिरकाव केला आहे.काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हत्तींनी कुरखेडा तालुक्याच्या भगवानपूर शेतशिवारात हैदोस घालत शेतकऱ्यांच्या ऊन्हाळी धान पिकांची पऱ्हे पायाखाली तुडवल्याने ऊन्हाळी धान उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.विशेष म्हणजे,आरमोरी तालुक्यात बस्तान मांडलेल्या जंगली हत्तींनी चार दिवसांपूर्वी चामोर्शी चक शेतशिवारात प्रचंड हैदोस घातला होता.परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतपिकाची तसेच शेतीपयोगी साहित्यांसह शेतमालाचे प्रचंड नुकसान केले होते.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला होता.प्रकरणी वनविभागाने परिसरातील नागरिक तसेच शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.बलाढ्य असलेले जंगली हत्ती बऱ्याच कालावधीपासून गडचिरोली जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी बस्तान मांडून धुमाकूळ घालत असल्याने नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!