Saturday, July 18, 2026
Homeगडचिरोलीउष्माघात टाळण्यासाठी काय करावे व काय करू नये....- उन्हापासून बचावाकरीता खालील उपययोजना...

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे व काय करू नये….- उन्हापासून बचावाकरीता खालील उपययोजना करा – जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते.उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी  पुढील उपाययोजना करण्यात याव्यात ;-

काय करावे 👇  

तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.हलकी,पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत.बाहेर जातांना गॉगल्स,छत्री,हॅट,बुट व चप्पलाचा वापर करण्यात यावा,प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी,जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा.तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान,चेहरा झाकण्यात यावा.उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस.घरी बनविण्यात आलेली लस्सी,आंबील,लिंबुपाणी, ताक इत्यादीचा वापर करण्यात यावा.अशक्तपणा, स्थुलपणा,डोकेदुखी,सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा,गुरांना छावणीत ठेवण्यात यावे,तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.घर थंड ठेवण्यासाठी पडदे,शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे,ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा.तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे,पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा,तसेच बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.जर गरोदर वा आजारी असाल तर अधिकची काळजी घेण्यात यावी. 

काय करु नये 👇

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या वा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.गडद,घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे,बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे.तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.तसेच आकस्मिक संपर्क करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली 07132-222191 वा 108 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्यात यावे; असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मु.का.अ.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणाऱ्या मोफत साडी योजनेला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २४ लाख ५८ हजार कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीच्या सणात मोफत दिली जाणारी साडी...

बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले; गंभीर जखमी शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या  शिक्षकाला वाटेतच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने धडक देत वाहनासह फरफटत नेले.यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू...

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदची घोषणा.. – २४ तासासाठी आरोग्यसेवा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या कल्याण-डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉ.सृष्टी बाविस्कर आणि डॉ.वैभव साळुंखे यांना झालेल्या कथित मारहाणीनंतर देशभरातील डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य...

३५२ कलावंतांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम.. – देसाईगंज,गडचिरोली व अहेरी येथे होणार पडताळणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या "राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना" अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र कलावंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!