नागपूर :-प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. मात्र,अल्पवयीन तरुणीसोबतचे प्रेमप्रकरण केव्हा अंगलट येणार याची कल्पना न केलेली बरी.अश्याच प्रकारे एका १९ वर्षीय तरुणाचा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जीव जडला.दोघेही पळून गेले,पण तरुण कायद्याच्या कचाट्यात सापडला अन् प्रेमात हरला.शेवटी त्याने तणावातून पोलीस ठाण्याच्या कोठडीतच चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,गुरुवार २२ जानेवारी रोजी नागपूरच्या जरीपटका येथे उघडकीस आली.नागेंद्रकुमार रामजी भाटीया वय १९ वर्षे,रा.मदारीपुरा,प्रयागराज,उत्तरप्रदेश असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो कामाच्या शोधात नागपुरात आला होता.कामाच्या शोधात नागपुरात आलेल्या कुमारची एका कामगाराच्या कुटुंबियांशी ओळख झाली.विशेष म्हणजे,कामगार कुटूंबीय हे सुध्दा मध्यप्रदेशातून नागपुरात आले होते.दरम्यान,काही कालावधीनंतर कुमार याचे त्यांच्या १६ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.त्यातून त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले.काही दिवसांपूर्वी कुमार याने मुलीला पळवून नेले. यामुळे कुटुंबीयांनी चिंता व्यक्त करून मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.प्रकरणी पोलिसांनी तपास यंत्रणा कामी लावून त्यांचा शोध घेतला असता,दोघेही तरुणाच्या गावी उत्तरप्रदेशातील मदारीपुरा या गावात आढळून आले.त्यानुसार,पोलिसांनी त्यांना नागपूरला परत आणले.दोघांनाही ताब्यात घेतल्यावर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कुमार याच्यावर सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले.यादरम्यान, पोलिसांनी त्याची चौकशी केली.अश्यातच आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोठडीजवळ कुणीही नसल्याची संधी साधून त्याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.सकाळी सहा वाजता ही बाब उघडकीस आल्यावर ठाण्यात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी,अप्पर आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त संदीप पखाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यात दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्रेमात हरला; तणावातून पोलीस ठाण्यातच घेतला गळफास..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

