- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी करतांना चूक झालेल्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असून ई-केवायसी चुकलेल्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या ‘एक्स’ अकाऊंटवर माहिती दिली आहे.माहिती देतांना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक-३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.
तथापि,काही कारणास्तव e-KYC करतांना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच,योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी(Physical Verification)करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.असे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले असल्याने ज्यांचे लाभ बंद करण्यात आले,अश्यांचे लाभ सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र,तांत्रिक कारणांमुळे ज्यांची ई-केवायसी राहून गेली,अशांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.
- Advertisement -

