Thursday, August 13, 2026
Homeगडचिरोलीकाळाचा घाला; अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा अपघात.. - दोघांचा...

काळाचा घाला; अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा अपघात.. – दोघांचा मृत्यू; तिघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नातेवाईकाचे अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा अपघात होऊन अनियंत्रित झालेली कार थेट पुलावरून नदीपात्रात कोसळली.यात कारमधील दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला,तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,मंगळवार २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्याच्या आष्टी महामार्गावरील मुक्तापूर येथील दीना नदीच्या पुलावर घडली.अपघातात सुनील मुरलीधर कोलपाकवार वय ६५ वर्षे व यादव कोलपाकवार वय ६७ वर्षे,रा. बोरी,ता.अहेरी यांचा अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला,तर अर्चना यादव कोलपाकवार वय ६० वर्षे, रा.आष्टी,ता.चामोर्शी, अभिजित यादव कोलपाकवार वय ३५ वर्षे व पद्मा सत्यनारायण कोलपाकवार वय ५५ वर्षे अशी गंभीर जखमिंची नावे असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले.
माहितीनुसार,अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात काल,सोमवार १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रवींद्र तंगडपल्लीवार वय ४७ वर्षे,रा.नागेपल्ली, ता.अहेरी,जि.गडचिरोली यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता.प्रकरणी त्यांची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.त्यानुसार, आज मंगळवारी रवींद्र तंगडपल्लीवार यांचे अंतिम संस्कार पार पडले.यासाठी कोलपाकवार कुटूंबीय कारने आले होते.त्यांचे अंतिम संस्कार आटोपून परतीच्या प्रवासात असतांनाच सदरचा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!