Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् पत्नीचा चढला पारा..! आता माझे १५०० रुपये कोण देईल? 'तरी यायले...

अन् पत्नीचा चढला पारा..! आता माझे १५०० रुपये कोण देईल? ‘तरी यायले सांगत होते घरी केवायसी करू नका’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती.त्यानुसार,राज्यातील सर्वच महिलांनी योजनेंतर्गत मिळणाऱ्या दीड हजाराचे लाभ घेतले.पण, काही कालावधीपासून ‘या ना त्या’ कारणाने लाडक्या बहिणी अपात्र ठरू लागल्या आहेत.पहिल्यांदा अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या महिला,तर नंतर ई-केवायसीने अनेक महिलांची डोकेदुखी वाढली.ई-केवायसीमुळे अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत.त्यामुळे,राज्याच्या विविध जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या महिलांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे.अश्याच प्रकारे अकोला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात एक जोडपे आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाही? हे पाहण्यासाठी गेले असता,त्यांना समजले की, लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी करतांना चूक झाली.सदर माहिती मिळाल्यानंतर पत्नीचा पारा एकदमच चढला आणि पती-पत्नीत कार्यालयातच जोरदार भांडणाला सुरुवात झाली.पत्नी म्हणाली, ‘तरी यायले सांगत होते घरी केवायसी करू नका,सेतूत करू, पण माझी एक गोष्ट ऐकत नाहीत.मनानेच करतात.आता माझे १५०० रुपये कोण देईल? असे म्हणत विषय जास्तच गंभीर होत गेला.तेव्हा तेथील लिपिकाला कामकाजच बंद करावे लागले.यावेळी कार्यालयातील अधिकारी सुनील लाडूळकर यांनी मध्यस्थी केली.विशेष म्हणजे,लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या कुटुंबात कुणी शासकीय नोकरीत असल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!