Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करतांना अनेक चुका.. - टोल फ्री क्रमांकावर करा...

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करतांना अनेक चुका.. – टोल फ्री क्रमांकावर करा संपर्क..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेचे पैसे तांत्रिक कारणांमुळे नाही,तर ई-केवायसी करतांना झालेल्या चुकांमुळे अनेक पात्र महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रत्येकी दीड हजार रुपये मिळालेले नाहीत.या चुका दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेले पोर्टल अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी करावी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्याने पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी केल्याशिवाय पर्याय नाही; अन्यथा लाभ बंद करण्यात येणार आहे.शासनाने ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती.या मुदतीत राज्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी तर केली,पण त्यात एका प्रश्नाने अनेकांना गोंधळात टाकले होते.तो प्रश्न म्हणजे, १.माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.असा प्रश्न असल्याने अनेकांनी याची माहिती भरतांना चुका केल्या. काहींनी नाही,तर काहींनी होय,असे टिक केले.महत्वाचे म्हणजे,याचे खरे उत्तर होय,असे आहे.ज्यांनी होय केले व ज्यांचे बँकेशी आधार लिंक आहे; अश्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रत्येकी दीड हजार प्रमाणे तीन हजार रुपये जमा झाले आहेत.अश्यातच अर्जातील माहिती आणि बँक खात्याची केवायसी यामध्ये किरकोळ तफावत असल्याने अनेक महिलांना ‘अपात्र’ ठरवण्यात आले आहे.त्यातच, बऱ्याच कालावधीपासून शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी योजनेच्या पोर्टलवर हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक-१८१ देण्यात आला आहे.लाडक्या बहिणींना काही अडचण असल्यास त्यावर संपर्क साधून समस्यांचे निराकरण करू शकतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!