Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीकायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जेईई परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जेईई परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा संस्था,नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा(जेईई मेन) २०२६ ही संगणक आधारित परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय चामोर्शी रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.सदरची परीक्षा ही दिनांक-२१,२२,२३,२४ व २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत(सकाळ सत्र) तसेच दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत(दुपार सत्र) घेण्यात येणार आहे.तसेच दिनांक-२९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या कालावधीत परीक्षा होणार आहे.
सदर परीक्षा शांत,सुरक्षित व तणावमुक्त वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ मधील कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार,निषिद्ध क्षेत्रात परीक्षा कालावधीत छायांकित प्रत काढण्याचे यंत्र,दूरलेख यंत्र तसेच सार्वजनिक दूरध्वनी केंद्रे सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्र व त्याच्या परिसरात भ्रमणध्वनी, संगणक,पेजर,ध्वनिमुद्रक,छायाचित्रण यंत्र आदी कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही.तसेच निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे,घोषणा देणे,भाषणे करणे,गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे प्रतिबंधित राहील.पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असून कोणत्याही प्रकारची शस्त्रे, काठ्या,लाठ्या,सोटे,तलवारी,भाले,बंदुका,सुरे किंवा शारीरिक इजा होऊ शकतील अशा वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.हा आदेश कर्तव्यावर असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लागू राहणार नाही.सदर अधिसूचनेतील कोणत्याही अटीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.सदरचा मनाई आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत अंमलात राहील,असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले
आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!