Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! व्हॉट्सॲपवर तुम्हालाही येऊ शकतो पत्र आणि लिंक..

सावधान..! व्हॉट्सॲपवर तुम्हालाही येऊ शकतो पत्र आणि लिंक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बँकेचे व्यवहार व ऑनलाईन पेमेंटचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी वेळोवेळी सावधान करून आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. माहितीच्या माध्यमातून घडलेल्या घटनांचा दाखला देत पुढील नंबर आपलाही असू शकतो,त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.सायबर चोरट्यांकडून एखाद्या व्यक्तीच्या मोबाइलवर बँक ऑफ इंडियाच्या वा तुमचे ज्या बँकेत खाते आहे; अश्या बँकेच्या नावाने संदेश येतो. त्यात,आपले खाते केवायसी न केल्याने बंद पडले आहे. त्यामुळे तातडीने केवायसी करण्याचे सांगितले जाते.या पत्रासोबतच केवायसी पत्राचा प्रोफार्मा असलेली एक लिंक पाठविली जाते.आलेल्या पत्रावर बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी,शिक्का असल्याने सहज विश्वास बसतो.त्यामुळे आलेली लिंक ओपन करून त्यात माहिती भरत असतांना डेबिट कार्डची माहितीही विचारली जाते.ती भरताच व्हॉट्सॲप आपोआप बंद पडतो. अश्याच प्रकारे चार दिवसांपूर्वी एका मित्राकडून बँक ऑफ इंडियाच्या नावाने आलेली व्हॉट्सॲप लिंक उघडल्यानंतर त्यामध्ये डेबिट कार्डची माहिती भरल्यावर काही वेळातच चार व्यक्तींच्या बँक खात्यातून पैसे फुरकन उडाले.या प्रकारातून १ लाख १६ हजार ११४ रुपयांवर सायबर चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात घडला.ज्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवर सायबर चोरटे लिंक पाठवून व्हॉट्सॲप अकाऊंट हँग करतात,त्या क्रमांकावर सेव्ह असलेल्या इतर सर्वच व्हॉट्सॲपवर ती लिंक आणि पत्रही जातो.या माध्यमातून सहजपणे लिंक ओपन करणेही महागात पडू शकते.त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!