Monday, October 26, 2026
Homeगडचिरोलीदुर्गम भागांतील नागरिकांना दर्जेदार तपासणीची सुविधा; अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळेचे उद्घाटन..

दुर्गम भागांतील नागरिकांना दर्जेदार तपासणीची सुविधा; अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळेचे उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा(इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी )चे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून रोगनिदान,आजारांची देखरेख व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मोठे बळ मिळणार आहे.
या प्रयोगशाळेमुळे संसर्गजन्य आजारांची तपासणी, पाणी व अन्ननमुने विश्लेषण,पर्यावरणीय नमुन्यांची चाचणी तसेच विविध जैविक तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.परिणामी आजारांचे लवकर व अचूक निदान होऊन वेळेत उपचार सुरू करता येणार असून संभाव्य साथरोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी उद्घाटक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस.लहाडे यांनी ही इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले.या सुविधेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार,विश्वसनीय व अचूक तपासणी सेवा उपलब्ध होईल,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अविनाश टेकाडे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली तसेच डॉ.नितीन टिपले वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.यावेळी सामान्य रुग्णालयातील डॉ. सचिन करंजेकर,शरीरविकृती शास्त्रज्ञ(वर्ग-१),डॉ. मुकुंद ढबाले,शरीरविकृती शास्त्रज्ञ यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी,वेगवान व लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कार चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कार चालकाचे स्टेअरिंगवरून अचानकपणे नियंत्रण सुटल्याने कार थेट तिसऱ्या लेनमधील अज्ञात वाहनाला मागून धडकून झालेल्या...

आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने...

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!