- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्याच्या खेड(मक्ता) ग्रामपंचायतीचे सरपंच व तीन सदस्यांना शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करणे भोवले आहे.अतिक्रमण केल्याचे सिद्ध होताच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम१४ (१) (ज-३)अंतर्गत चिमूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौघांनाही तात्काळ अपात्र घोषित केल्याने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.अपात्र झालेल्यांमध्ये सरपंच दीक्षा जयदेव भजनकर,सदस्य सुनीता मुरलीधर सावस्कर,भोजराज शिवराम बारसगाडे व चंद्रकला घनश्याम गोनाडे यांचा समावेश असून चौघांच्याही कुटुंबीयांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून पक्की घरे बांधली होती.विशेष म्हणजे,ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज दाखल करतांना अतिक्रमण केलेल्या जागेचा उल्लेख करण्यात आला नव्हता.त्यामुळे ग्रामस्थ नितीन मेश्राम व सचिन यशवंत मेश्राम यांनी ॲड.किशोर चोपकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीनंतर ब्रम्हपुरीचे तहसीलदार व वन विभागाकडून अहवाल मागविण्यात आले.त्यानंतर सदरचे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले.प्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी पार पडली.त्यात सरपंचासह तीन सदस्यांनी शासकीय कुरण व वनविभागाची जमीन यावर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होताच चिमूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून चौघांनाही अपात्र घोषित केले.
- Advertisement -

