Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीभरधाव दुचाकी झाडावर आदळली; देसाईगंजच्या नवीन लाडज येथील इसमाचा मृत्यू..

भरधाव दुचाकी झाडावर आदळली; देसाईगंजच्या नवीन लाडज येथील इसमाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सरते वर्ष आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अपघातांचे प्रमाण अधिक असते,असे अनेकजण म्हणत असतात आणि हे खरे असल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे देसाईगंज तालुक्याच्या नवीन लाडज येथील इसमाचा दुचाकीने अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास मोहगाव-नगरी फाट्यानजीकच्या वळणावर घडली. फुलबार भरत गिरी वय ५९ वर्षे,रा.नवीन लाडज,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव असून ते एमएच ३३ एजे- ३०६३ क्रमांकाच्या दुचाकीने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथे काही कामानिमित्त गेले होते. तेथील कामे आटोपून चंद्रपूर-गडचिरोली मार्गाने देसाईगंजकडे परत येत असतांना गडचिरोली पासून काही अंतरावर असलेल्या मोहगाव-नगरी फाट्यानजीकच्या वळणावर येताच फुलबार यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेले वाहन मार्गावरून खाली जाऊन एका झाडाला आदळले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.लागलीच घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत अपघात जखमी झालेल्या फुलबार यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.मात्र,तोपर्यंत खूप उशीर झाला होता.तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता फुलबार यांची प्राणज्योत मावळली.प्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मुकेश बिके करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!