Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोने-चांदीचे दर कळालले; पहा आजचे दर..

सोने-चांदीचे दर कळालले; पहा आजचे दर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून सोने आणि चांदी ही दोन्ही मौल्यवान धातू भाव वाढीत एकमेकांची साथ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात आज,सोमवार २२ डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावांनी एक नवीन उच्चांक गाठला आहे.चांदीच्या भावात ७ हजार २१४ रुपये प्रति किलोची मोठी वाढ झाली आहे,तर सोन्याच्या भावात १ हजार १९० रुपयांची वाढ झाली आहे.जीएसटीसह चांदी आता २ लाख १३ हजार ७७६ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ३७ हजार ५९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.शुक्रवारी चांदीचा दर जीएसटीशिवाय २ लाख ३३६ रुपये प्रति किलो आणि सोने जीएसटीशिवाय १ लाख ३२ हजार ३९४ रुपये प्रति १० ग्रॅम होते.अश्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात सोने जीएसटीशिवाय १ लाख ३३ हजार ५८४ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचले आहे.दुसरीकडे,चांदी जीएसटीशिवाय २ लाख ७ हजार ५५० रुपये प्रति किलो दराने उघडली.या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात ५७ हजार ८४४ रुपयांची तर चांदीच्या दरात १ लाख २१ हजार ५३३ रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे.सोने-चांदीचे दर हे आयबीजेएद्वारे (IBJA)जाहीर करण्यात आले आहेत,ही संस्था दिवसातून दोनदा दर प्रसिद्ध करत असते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!