Sunday, July 19, 2026
Homeगडचिरोलीसर्व महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज वेळेत मंजुरीसाठी सादर करा.

सर्व महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज वेळेत मंजुरीसाठी सादर करा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ,वरिष्ठ तसेच व्यावसायिक व बिगरव्यावसायिक,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी सन २०२२-२३ ते सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील अनुसूचित जाती,इतर मागासवर्ग,विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन भरलेले शिष्यवृत्ती अर्ज  महाविद्यालय स्तरावर योग्यरीत्या तपासून तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
निर्धारित कालावधीत महाडिबीटी पोर्टलवरील पात्र प्रलंबित अर्जांची संपूर्ण तपासणी करून विहीत वेळेत मंजुरी प्रक्रियेसाठी अर्ज सादर न केल्यास किंवा अर्ज प्रलंबित राहिल्यास,संबंधित अर्ज महाडिबीटी प्रणालीतून आपोआप ‘ऑटो रिजेक्ट’ करण्यात येणार आहेत.यानंतर अर्ज सादर करण्यासाठी किंवा महाविद्यालयांकडून ते मंजूर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे सन २०२२-२३ ते सन २०२४-२५ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत,अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शैक्षणिक सत्र सन २०२५-२६ साठी अनुसूचित जाती,इतर मागासवर्ग,विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन तसेच नुतनीकरणाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महाविद्यालयीन फी स्ट्रक्चरशी संबंधित सर्व कार्यवाही पूर्ण करून,नवीन व नुतनीकरण केलेले संपूर्ण अर्ज योग्यरीत्या तपासून दिलेल्या विहीत मुदतीत या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करावेत.
ज्या महाविद्यालयांमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे,अशा महाविद्यालयांनी नुतनीकरणाचे अर्ज प्राधान्याने व लवकरात लवकर सादर करावेत.तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्जही वेळेत या कार्यालयाकडे फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निर्धारित विहीत मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज या कार्यालयाकडे फॉरवर्ड न केल्यास आणि एखादा पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास,त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर राहील.या संदर्भात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही,याची सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी,असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!