Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीआंतरराष्ट्रीय एशियन युथ पॅरा गेम्समध्ये दोन पदकांची कमाई करणाऱ्या श्वेता कोवे चा...

आंतरराष्ट्रीय एशियन युथ पॅरा गेम्समध्ये दोन पदकांची कमाई करणाऱ्या श्वेता कोवे चा जिल्हा प्रशासनाकडून गौरव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच दुबई येथे ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत झालेल्या “एशियन युथ पॅरा गेम्स” या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या कु.श्वेता मंजु भास्कर कोवे हिने धनुर्विद्या(कंपाऊंड राऊंड)प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक व सांघिक कांस्यपदक पटकावून जिल्ह्याचे,राज्याचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल केले.तिच्या या घवघवीत कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल आज,गुरुवार १८ डिसेंबरला गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या हस्ते जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या वतीने कु.श्वेता कोवे हिचा सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, “कु.श्वेता कोवे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी अत्यंत गौरवास्पद असून तिचे यश हे गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी नमूद केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.श्वेता कोवे ही खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र,आष्टी (ता. चामोर्शी)येथील महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षात शिक्षण घेत असून ती वर्ग आठवीपासून धनुर्विद्या या खेळाचा नियमित सराव करीत आहे.सध्या तिचा सराव खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र,आष्टी येथे सुरू असून प्रा.डॉ.श्याम कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिला तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!