Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी व पशुपालकांनी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन..

शेतकरी व पशुपालकांनी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे आयोजन येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली तालुक्यातील कनेरी (पारडी)येथील प्रियंका हायस्कूल समोरील शंकरपटाच्या मैदानावर करण्यात आले आहे.या पशुप्रदर्शनीत जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी सहभागाची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पशुप्रदर्शनीत गाय व म्हैस,शेळी,कुक्कुट आदी पशुधनाचा समावेश राहणार असून सहभागी पशुपालकांना आपल्या पशुंची नि:शुल्क नोंदणी करून प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे.पशुपालन क्षेत्रातील प्रगती,सुधारित पशुसंवर्धन पद्धतींचा प्रसार तसेच गुणवत्तापूर्ण पशुधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनीच्या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत पशुंची नोंदणी करण्यात येणार असून सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत उत्कृष्ठ पशुंची निवड करण्यात येईल. यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन शेतकरी व पशुपालकांना लाभणार आहे.त्यानंतर निवड झालेल्या उत्कृष्ठ पशुधनासाठी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय गडचिरोली डॉ.गणेश मेश्राम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!