उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया उद्या,मंगळवार २ डिसेंबर रोजी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पार पडणार आहे.विशेषतः नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत आज,सोमवार १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत प्रचारास परवानगी दिली आहे. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार व पक्षांना दिलासा मोठा मिळाला.मात्र,रात्री पर्यंत प्रचार चालणार असल्याने अनेकजण प्रचारात दंग राहणार,अश्यातच विविध प्रभागात लावलेले बॅनर, पोस्टर,होर्डिंग्ज आणि जाहिरात फलक काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? हा प्रश्न उभा राहिला आहे.कारण,उद्या पहाटेपासूनच मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. केवळ काही तासांच्या अंतरात शहर पूर्णपणे प्रचारमुक्त करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.आचारसंहितेनुसार, मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य दिसता कामा नये. मात्र रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू असल्याने क्षेत्रात शिल्लक राहिलेल्या जाहिराती मतदारांच्या नजरेस पडल्यास जबाबदार कोण? इतकेच नव्हे तर मतदानाच्या दिवशी प्रशासनाचे लक्ष पोलिंग पार्टीची तैनाती,मतदान केंद्रांची तयारी व सुरक्षा यांसारख्या तातडीच्या कामांवर केंद्रित असते.त्याच वेळेत शहरातील फलक हटवण्याची मोहीम कोण राबवणार? दुसरीकडे,कार्यकर्ते मतदानाची तयारी करणार की फलक हटविणार?असा प्रश्न निर्माण झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय ॲक्शन घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आज रात्री १० पर्यंत प्रचार अन् उद्या सकाळीच मतदान प्रक्रिया.. – प्रभागात लावलेले बॅनर-पोस्टर काढणार कोण?
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

