Friday, October 23, 2026
Homeगोंदियामन हेलावणारी घटना..! एक दिवसाच्या मुलाचा विहिरीत आढळला अर्भक..

मन हेलावणारी घटना..! एक दिवसाच्या मुलाचा विहिरीत आढळला अर्भक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-तालुक्यातील एकोडी गावात मन हेलावणारी घटना घडली आहे.चक्क घराच्या आवारात असलेल्या विहिरीतील पाण्यात एक दिवसाच्या बाळाचे मृत अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.सकाळच्या सुमारास विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेले असता सदरची घटना उघडकीस आली आहे.प्रकरणी गोंदिया येथून फॉरेन्सिक पथकास पाचारण करण्यात आले. मृत अर्भक विहिरीबाहेर काढून पथकाच्या प्राथमिक तपासणीत मृत अर्भक हे एक दिवसाचे व मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले.बाळाचा मृत्यू झाल्यावर त्याला विहिरीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.अर्भक शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान,याप्रकरणी एकोडी गावातील एका संशयित कुटुंबाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यातील नेमके सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती अशी की,गोंदिया तालुक्याच्या एकोडी गावातील राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घराच्या आवारात विहीर असून त्यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे काल शनिवारी सकाळच्या सुमारास विहिरीचे पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ गेले.विहिरीत पाहतात तो काय पाण्यात एक मृत अर्भक तरंगताना दिसून आला. सदरची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली.लागलीच घटनेची माहिती गंगाझरी पोलिस ठाण्याला मिळताच घटनास्थळी पीएसआय सुधीर वर्मा पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत  पंचनामा केला.घटनेने परिसरात शंका-कुशंका वाढीस लागून चर्चेला उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!