Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाचे हेल्पलाइन क्रमांक.. - विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास...

आता शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाचे हेल्पलाइन क्रमांक.. – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जितके दिवस नुकसान तितकेच दिवस अधिकारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शालेय बसेस वेळेवर न सुटणे, बसमधील गर्दीमुळे थांब्यावर न थांबणे,बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे,यामुळे अनेक शालेय  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मंत्री सरनाईक यांनी यापूर्वीच आम्ही राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी येत्या काळात एसटी महामंडळाची एक हेल्पलाइन सुरू करणार आहोत,असे स्पष्ट केले होते.त्यानुसार,आता शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेला जातांना,शाळेतून घरी येतांना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास,अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी,यासाठी एसटी महामंडळाने १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल,तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे,असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.त्याचबरोबर,आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा,महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थ्यांना विभाग नियंत्रकांशी संपर्क साधता यावा,यासाठी ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!