Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअवैध रेतीची वाहतूक करताय; जरा सांभाळून.. आता वाहनाचा परवाना होणार रद्द; शासन...

अवैध रेतीची वाहतूक करताय; जरा सांभाळून.. आता वाहनाचा परवाना होणार रद्द; शासन परिपत्रक जारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अवैध गौण खनिजांची चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अवैध गौण खनिज चोरीत एकदा कां सापडलेले वाहन परत त्याच कामासाठी वापरण्यात येत असल्याने राज्यातील रेती व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूकीवर आळा घालण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अत्यंत कठोर निर्णय घेऊन यानंतर अवैध उत्खनन व वाहतुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर थेट कारवाई करण्याबाबत आज,बुधवार २६ नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक जारी करण्यात आला आहे.
  • काय म्हटले आहे शासन परिपत्रकात👇
राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन,वापर,वाहतुक व तस्करीसाठी ड्रील मशीन,जेसीबी व पोकलैंड,ट्रॅक्टर,ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक,फुल बॉडी ट्रक,डंपर,ट्रॉलर,कॉम्प्रेसर,ट्रॉलर,बार्ज, मोटोराईज्ड बोट,एक्सकॅवेटर,मॅकेनाईज्ड लोडर यासारख्या वाहनांचा वापर करण्यात येत असल्याचे वारंवार प्रकार घडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे महसुलाची तसेच पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे.
वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन,वापर व वाहतूक रोखण्यासाठी अशा व्यक्तींवर जबर कारवाई करणे आवश्यक असल्याने,अशा व्यक्तींविरोधात परिवहन विभागाचे विविध कायदे/अधिनियम/नियम याअन्वये कारवाई करण्यात आल्यास वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन,वापर,वाहतुक व तस्करीचे वारंवार होणारे प्रकार नियंत्रणात आणणे शक्य होण्यासाठी तसेच महसुलाची तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच अनधिकृतपणे होणाऱ्या या व्यवहारात सामिल वाहनधारकांना जरब बसण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणास निर्देश देण्याबाबत विभागाने विनंती केली होती. त्यानुषंगाने राज्य परिवहन प्राधिकरणाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकणांनी निर्णय घेण्याकरिता दिलेल्या निर्देशाची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी सदर निर्देश क्षेत्रीय यंत्रणेच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुषंगाने खालील प्रमाणे सूचना/निर्देश देण्यात येत आहेत.
राज्य परिवहन प्राधिकरणाने वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन,वापर व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यासाठी व राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कामकाजात समानता राहण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांच्या धोरणामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राज्यात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन,वापर व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवान्यावर मोटार वाहन अधिनियम,१९८८ च्या कलम ८६ मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी खालीलप्रमाणे निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले आहेत:-
गुन्ह्याचे स्वरूप-राज्यात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन करून अवैधपणे वाहतूक करणारी वाहने
पहिला गुन्हा-३० दिवस परवाना निलंबित व वाहन अटकावून ठेवणे
दुसरा गुन्हा-६० दिवस परवाना निलंबित व वाहन अटकावून ठेवणे
तिसरा गुन्हा-वाहन अटकाव करून परवाना रद्द करण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत कार्यवाही करणे.
यामुळे अवैध गौण खनिज वाहतूकीवर आळा घातला जाईल व वारंवार होणारी तस्करी रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून येते.त्याचबरोबर
वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध/अनधिकृत,उत्खनन, वापर,वाहतूक व तस्करी रोखण्याच्या अनुषंगाने संबंधित वाहनांची माहिती क्षेत्रीय यंत्रणेने संबंधित परिवहन यंत्रणेस कळविण्याची कार्यवाही करावी जेणे करून संबंधित वाहनांवर कारवाई करणे शक्य होईल,असेही परिपत्रकात नमूद आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!