- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शालेय बसेस वेळेवर न सुटणे, बसमधील गर्दीमुळे थांब्यावर न थांबणे,बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे,यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मंत्री सरनाईक यांनी यापूर्वीच आम्ही राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी येत्या काळात एसटी महामंडळाची एक हेल्पलाइन सुरू करणार आहोत,असे स्पष्ट केले होते.त्यानुसार,आता शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेला जातांना,शाळेतून घरी येतांना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास,अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी,यासाठी एसटी महामंडळाने १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल,तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे,असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.त्याचबरोबर,आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा,महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थ्यांना विभाग नियंत्रकांशी संपर्क साधता यावा,यासाठी ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत.
- Advertisement -

