- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नुकतेच वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या पुराडा वन परिक्षेत्रातील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण उजेडात आले आहे.प्रकरणी गडचिरोली आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.अश्यातच प्रकरणातील काही अधिकारी, कर्मचारी अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पळवाटा शोधण्यात मग्न असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र,अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी पळवाटा शोधणार तरी किती?असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.त्यावर बचाव कार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक नजर जरी टाकली,तर अनेकांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाहीत.
- घटना कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर👇
वडसा वन विभागांतर्गत येणारा पुराडा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि झालेली अवैध सागवान वृक्षतोड ही कार्यालयापासून कोरची मार्गे अडीच किलोमिटर अंतरावर असून मुख्य मार्गाला लागून आहे.अडीच किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर कोरचीकडे जातांना उजव्या हातावर तर बेळगाव- कोरची वरून येतांना डाव्या हातावर.जंगल परिसरात जाण्याची गरज नाही,तर मुख्य मार्गावर उभे झाल्यास बाजूलाच मुरूम टाकलेला दिसून येतो व तब्बल ९ सागवान वृक्षांची अवैधरीत्या वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट निदर्शनास येते.
- कुख्यात तस्करांचा हात👇
तब्बल ९ सागवान वृक्षांची अवैधरीत्या वृक्षतोड तर झालीच,पण यात साधारण तस्करांचा हात नसून कुख्यात तस्करांचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कारण की,वृक्षतोड करतांना कुऱ्हाड किंवा इतर साधारण साहित्य वापरण्यात आले नाहीत,तर पेट्रोल वा डिझेलवर चालणाऱ्या मशिनचा वृक्ष कटाईसाठी वापर करण्यात आल्याचे दिसून येते.वृक्षाचे बुड म्हणजेच थुट पूर्णपणे चाटी आणि एकसमान असल्याने कुणाच्याही पटकन लक्षात येते.
- एकाच नियतक्षेत्राच्या एकाच कक्ष क्रमांकामधून दोनदा चोरी होणे अशक्य👇
ज्याठिकाणी अवैध सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली,असा कक्ष क्रमांक-२४१ हा एकच असून रामगड उपक्षेत्राच्या रामगड नियतक्षेत्रात येतो आणि तोही मुख्य मार्गालगतच असल्याने चोरी करणारे एकदा चार किंवा पाच वृक्ष तोडून परत त्याच जागेहून चोरी करणे अशक्य आहे.कारण की,वन विभागाच्या पथकाच्या वतीने दररोज गस्त घालण्यात येते.त्यामुळे परत पुन्हा त्याच ठिकाणाहून काही वृक्षांची तोड करणे म्हणजे कर्तव्यात कसूर करण्यात आली.विशेष म्हणजे,पुराडा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयापासून कोरची मार्गे अफाट अशी सागवान वृक्ष लागवड आहे.मात्र,चोरट्यांनी इतर ठिकाण न निवडता एकच ठिकाण निवडून एकाच ठिकाणाहून दोनदा चोरी केली नाही,तर एकदाच तब्बल ९ सागवान वृक्षांची तोड केल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे दोनदा चोरी करणे,हे संशयास्पद आहे.
- घटना पूर्वीची आता सारवासारव👇
कोणी कितीही शक्कल लढवत असला,तरीही परिधान केलेले जुने वस्त्र आणि नवीन वस्त्रांची पारख करणे अगदी सोपे आहे.अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणात तसेच आहे.कत्तल करण्यात आलेल्या बुडांवर(थुट)
एक नजर टाकली तर तीन महिन्यांपूर्वीच तब्बल ९ सागवान वृक्षांची तोड झाल्याचे स्पष्ट होत आहे; असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून कारवाईची टांगती तलवार येऊन ठेपल्याने आता अनेकांकडून प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.
- अवैध सागवान वृक्षतोडीसाठी बनविण्यात आलेला रस्ता👇
- Advertisement -

