उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत वायू प्रदूषण विरोधात गेल्या रविवारी काही संघटनांकडून निदर्शने करण्यात आली.त्यात अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते.अश्यातच घोषणाबाजी करत असतांनाच जहाल नक्षलवादी माडवी हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.प्रसंगी दिल्ली पोलीसांनी निदर्शनास अटकाव करून घोषणाबाजी रोखण्याचा प्रयत्न केला असता निदर्शकांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे हल्ला चढवला होता.यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत होऊन रुग्णालय गाठावे लागले.अश्यातच आता दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवून तब्बल २२ जणांना अटक केली आहे.देशविरोधी कृत्याचा आरोप असलेल्या संघटनांपैकी एकाचे नाव महान स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या नावावर आहे.’दिल्ली अगेन्स्ट क्लीन एअर’ या बॅनरखाली अनेक संघटनांनी संयुक्तपणे निषेधाचे आयोजन केले होते.सायंटिस्ट फॉर सोसायटी, हिमखंडा आणि भगतसिंग छात्र एकता मंचसारख्या संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इंडिया गेटसमोर सी-हेक्सागॉन येथे बॅनर आणि पोस्टर घेऊन गोळा झाले होते.दिल्ली वायू प्रदूषणाच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर असल्याने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.घोषणाबाजी करतांनाच काहींनी चकमकीत मारला गेलेला कुख्यात नक्षली माडवी हिडमाचे समर्थन देणारी घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली होती.’इंडिया गेट’ येथे रविवारी झालेल्या निदर्शनामध्ये नक्षलवादी हिडमाला पाठिंबा देणाऱ्या घोषणा काही आंदोलकांनी दिल्या. ‘हिडमा अमर रहे, किती हिडमांना मारणार,प्रत्येक घरात एक हिडमा निर्माण होईल’,अशी घोषणाबाजी केली गेली.गेल्या आठवड्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये हिडमा पोलीस चकमकीत ठार झाला होता.आदिवासींच्या हितासाठी हिडमाने शस्त्रे हातात घेतली होती.तो शोषितांसाठी लढत होता,असा दावा घोषणाबाजी करणारे आंदोलक करत होते.प्रकरणी दिल्ली पोलीस आता ॲक्शन मोडवर येऊन नक्षल समर्थक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे करणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्याचे काम करत आहेत.
जहाल नक्षलवाद्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; तब्बल २२ जणांना अटक..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

