Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत; आज शपथ विधी सोहळा संपन्न.

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत; आज शपथ विधी सोहळा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज,सोमवार २४ नोव्हेंबरला शपथ घेतली.राष्ट्रपती भवनातील आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.संविधानाचे सर्वोच्च संरक्षण असलेल्या सरन्यायाधीशांनी संविधानाऐवजी सर्वप्रथम देवाच्या साक्षीने शपथ घेणे चर्चेचा विषय ठरला आहे.काल रविवारी भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ संपला.ते सहा महिने सरन्यायाधीश राहिले. न्यायमूर्ती कांत यांचा कार्यकाळ सुमारे १४ ते १५ महिन्यांचा असेल.ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होतील.सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती,बदली आणि पदोन्नतीचे नियमन करणाऱ्या कायद्यानुसार,सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तीना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते.या परंपरेनुसार,न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश झाले.सरन्यायाधीश देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च अधिकारी असतात.ते फक्त न्यायमूर्ती म्हणूनच निर्णय घेत नाहीत,तर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व प्रशासकीय कामांसंदर्भात देखील निर्णय घेतात.कोणत्याही खटल्याची सुनावणी कधी होणार आणि कोणत्या न्यायमूर्तीसमोर ही सुनावणी होणार हे ठरवण्याची मोठी ताकद या पदामध्ये आहे. म्हणूनच सर्वच निकालांमध्ये सरन्यायाधीश हे ‘अप्रत्यक्ष’ शक्ती,असे म्हटले जाते.संवैधानिक,सेवा आणि नागरी कायद्यातील कौशल्यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे.या कालावधीत त्यांनी भारतातील विविध न्यायालये आणि कायदेशीर संस्थांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.हरियाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली.१९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी हिसार येथील जिल्हा न्यायालयात सराव सुरू केला. १९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सराव करण्यासाठी चंदीगडला गेले,जिथे त्यांनी संवैधानिक,सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले.गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विद्यापीठे, मंडळे,महामंडळे,बँका आणि उच्च न्यायालयातही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!