- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते.यावर्षी खरीप हंगाम २०२५-२६ साठी आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थांची ५४ पैकी ४७ धान खरेदी केंद्रे शुक्रवार,२१ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली असून येत्या,मंगळवार २५ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष धान खरेदी करण्यात येणार आहे.त्यानुसार कुरखेडा तालुक्यातील-१७ खरेदी केंद्र, कोरची तालुका-७ खरेदी केंद्र,आरमोरी तालुका-३ खरेदी केंद्र,गडचिरोली तालुका-१ खरेदी केंद्र,धानोरा तालुका-८ खरेदी केंद्र,चामोर्शी तालुका-४ खरेदी केंद्र,देसाईगंज(वडसा) तालुका-१ खरेदी केंद्र,सिरोंचा तालुक्यातील-६ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.सदर खरेदी केंद्रांचे संचालन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी आणि अधिकृत पावती घ्यावी,असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक,गडचिरोली यांनी केले आहे.
- Advertisement -

