Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना..

आता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नागपूर जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येताच अनेकांचे धाबे दणाणले होते. मोठ-मोठे मासे जाळ्यात अडकून पडल्याने शिक्षण विभागासह शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अश्यातच शिक्षण विभागातील बदल्या आणि नियुक्त्यांवरून मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या चर्चेअंती शासनाने मोठा बदल केला आहे. पूर्वी खासगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांची मान्यता घ्यावी लागत असे.ही मान्यता घेतांना काही प्रकरणात  अनियमितता झाल्याचे आरोप आहेत.त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे थेट आयुक्तांना देण्यात आले आहेत.बनावट कागदपत्रांच्या आधारे विना अनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत नियुक्ती देण्यात आली आणि संबंधितास शालार्थ आयडी देऊन पगारही सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता,विना अनुदानित शाळेतून अनुदानित शाळेतही बदली करण्यात आल्याचे प्रकार झाल्याची माहिती आहे.अशी बदली करतांना शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांची मान्यता घेणे आवश्यक होते.परंतु, नियमबाह्यरीत्या अशा बदल्यांना मान्यता देण्याचेही प्रकार समोर आल्याने अनियमितता बघता शासनाने हे अधिकार आता शिक्षण आयुक्तांकडे दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!