Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीआता नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांनाही मिळणार एकवेळ चौरस आहार.....

आता नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांनाही मिळणार एकवेळ चौरस आहार.. – योजनेत पाच तालुक्यांचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या वतीने पेसा क्षेत्रात राहणाऱ्या गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांसाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना लागू आहे.या योजनेद्वारे या मातांना अंगणवाडी केंद्रांमार्फत एकवेळ चौरस आहार पुरवला जातो.मात्र,गडचिरोली जिल्ह्यातील नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांसाठी अशा प्रकारची कोणतीही योजना उपलब्ध नव्हती.पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील ही दरी भरून काढण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाने वेस्टर्न कोल फिल्ड यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एकवेळ चौरस आहार पुरवण्यासाठी “मिशन संपूर्ण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि व्याप्ती👇
उद्देश: गडचिरोली जिल्ह्यातील नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना अंगणवाडी केंद्रांमार्फत एकवेळ चौरस आहार पुरवणे.
निधी स्रोत: या मिशनसाठी लागणारा संपूर्ण निधी वेस्टर्न कोल फिल्डच्या सीएसआर(CSR)निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
समाविष्ट तालुके: या योजनेत आरमोरी,देसाईगंज, गडचिरोली,चामोर्शी आणि मुलचेरा या पाच तालुक्यातील नॉन-पेसा क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.
कालावधी: ‘मिशन संपूर्ण’ ची सुरुवात ऑक्टोंबर २०२५ मध्ये झाली असून हे मिशन पुढील पाच महिने, म्हणजेच फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
लाभार्थी संख्या: या मिशनमध्ये एकूण ३९७ अंगणवाडी केंद्रांतील सुमारे १ हजार ३५० गरोदर स्त्रिया आणि सुमारे १ हजार ४०० स्तनदा माता यांना लाभ मिळणार आहे.
आहाराचे स्वरूप: या मिशन अंतर्गत नॉन-पेसा क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात नोंदणीकृत गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना एकवेळ संपूर्ण चौरस आहार दिला जातो.यात भात,पोळी,वरण,अंडी/केळी आणि शेंगदाणा लाडू/चिक्की यांचा समावेश आहे.या मिशनमुळे नॉन-पेसा भागातील मातांना पोषण आणि आधार मिळेल,ज्यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होईल,असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी व्यक्त केले.तर ‘मिशन संपूर्ण’ नॉन पेसा क्षेत्रातील मातांसाठी ‘संपूर्ण’ आहाराची सुविधा सुरू करण्यात आल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!