- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या.विविध भागात ६ हून अधिक भागांत आगीचा भडका उडाला.फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले होते.अश्यातच नागपूर शहरातील लक्ष्मीनगर येथील रिलायन्स मॉलच्या ९ मजली इमारतीला २२ ऑक्टोंबरच्या रात्री ९ वाजता आग लागून आगीत अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायरिंग,वॉशिंग मशीन,इलेक्ट्रिक साहित्य,एसी व इतर मौल्यवान साहित्य असे एकूण जवळपास ५० लाखांचे नुकसान झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच नागपूर महानगर पालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी लागली असल्याने वाढत गेली.रात्रभर ६ अग्निशामक बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.यासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे नागपूर शहराच्या विविध भागात आगीच्या तब्बल सहा घटना घडल्या होत्या.फटाक्यांच्या ठिणग्या कचरा व वाहनावर उडाल्याने अनेक ठिकाणची वाहने जळून खाक झाली होती.अश्यातच आता नागपूरच्या लक्ष्मीनगर येथील रिलायन्स मॉलच्या ९ मजली इमारतीला आग लागल्याप्रकरणी इमारतीतील रहिवासी अनिल द्वारकादास गांधी वय ६८ वर्षे यांनी तक्रार दाखल केल्याने बजाजनगर पोलिसांनी रिलायन्स मॉलचे अधिकारी,जमीन लीजवर देणारे १२ व्यक्ती आणि महाचायचे अधिकारी अशा १८ जणांविरुद्ध कलम १२५,१२६(१),२८७,३२९(१), ३२४(१), ३२६(एफ), ३२६ (जी),३(५)नुसार गुन्हा दाखल केला आहे.रिलायन्स मॉलच्या इमारतीत निवासी आणि व्यावसायिक गाळे आहेत.रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर मॉलने २०२१ नंतर कुठलेही फायर ऑडिट केले नव्हते.अनिल गांधी यांनी वारंवार रिलायन्स स्मार्टचे अधिकारी व जागेच्या मालकांना सूचना दिली होती.परंतु,त्याबाबत काहीच उपाययोजना न केल्यामुळे ही भीषण आग लागली आणि अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायरिंग,वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक साहित्य,एसी व इतर मौल्यवान साहित्य जळून खाक झाले,त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले.वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर अशी घटना घडली नसती.प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
- Advertisement -

