Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज २१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; १३ महिला तर ८ पुरुष सदस्यांचा समावेश..

आज २१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; १३ महिला तर ८ पुरुष सदस्यांचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यानुसार,देशातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच त्यांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार आटोकाने प्रयत्न करीत असून सुरक्षा दल त्या दिशेने पाऊले उचलीत आहे. अश्यातच आज,रविवार २६ ऑक्टोंबर रोजी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात तब्बल २१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यात १३ महिला तर ८ पुरुष सदस्यांचा समावेश समावेश आहे. त्याचबरोबर,१८ शस्त्रेही अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. यात ३ एके ४७ रायफल्स,४ एसएलआर रायफल्स,२ आयएनएएसएएस रायफल्स,सहा ३०३ रायफल्स,२ सिंगल शॉट रायफल्स आणि १ बीजीएल शस्त्र सुपूर्द केले.बस्तर रेंज पोलिसांनी सुरू केलेल्या ‘पूना मार्गेमः पुनर्वसनाद्वारे पुनर्मिलन’ या उपक्रमांतर्गत नक्षल वाद्यांनी शस्त्रे टाकली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आत्मसमर्पण करणाऱ्या २१ नक्षलवाद्यांमध्ये ४ डीवीसीएम,९ एसीएम आणि ८ पक्ष सदस्यांचा समावेश आहे.संपूर्ण नक्षलवादी हे केशकाल विभागाच्या कुएमारी/किस्कोडो क्षेत्र समितीचे भाग होते.यामध्ये समितीचा सचिव मुकेशचाही समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!