- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी नागपूर-दिल्लीसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे एआय-४६६ हे विमान टेकऑफ नंतर अवघ्या १० मिनिटांतच परत उतरवण्यात आले होते. सुरुवातीला विमानाला पक्षी धडकला असावा,अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र,काल शनिवारी रात्रीपर्यंत झालेल्या तपासणीत विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले. विमानावर बर्ड हिटचे कोणतेही चिन्ह आढळलेले नाही.विशेष म्हणजे, काही कालावधीपासून विमान दुर्घटनेच्या घटना घडू लागल्याने ‘नो रिस्क’ म्हणून सदरचा निर्णय तात्काळ घेण्यात आला.सदरचे विमान हे १८० प्रवासी क्षमतेचे असून विमानात १६० प्रवासी दिल्लीला प्रवास करीत होते.बिघाडामुळे काहींना इंडिगोच्या विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले,तर काहींना मुंबईमार्गे दिल्लीला रवाना करण्यात आले,तर काहींनी आपली यात्रा रद्द केली. उड्डाण केलेले विमान परतल्यानंतर टेक्निकल टीमने तपासणी करून पायलटला उड्डाणासाठी ‘ओके’ दिले होते; परंतु पायलटने इंजिनमध्ये जाणवणाऱ्या वायब्रेशनची तक्रार नोंदवून अधिक सखोल तपासणी करण्याची मागणी केली.सुरुवातीला बर्ड हिटचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी तांत्रिक तपासणीत हे प्रकरण केवळ तांत्रिक बिघाडाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- Advertisement -

