Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीसामाजिक बांधिलकी.. श्री साई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान व...

सामाजिक बांधिलकी.. श्री साई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान व फळवाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहराच्या साईनगर येथील श्री साई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दिवाळी निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत “अन्नदान हेच श्रेष्ठदान” या संकल्पनेतून मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देऊन अन्नदान व फळवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच परिसरातील स्वच्छतेसंदर्भात पाहणी केली.नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू,अशी ग्वाही भाजपा युवा मोर्चा शहर महामंत्री निखिल गुंडमवार यांनी यावेळी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नागरिकांच्या सहकार्याने साजरा होणाऱ्या या उत्सवातील निधीचा एक भाग सामाजिक उपक्रमात रूपांतरित करून अन्नदान व फळवाटप कार्यक्रम राबविण्यात आला.वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाने अन्नदान व फळांचा प्रसाद वाटून सन्मानित करण्यात आले.या उपक्रमामुळे वृद्धाश्रमात काहीकाळ कां असेना आनंदाचे वातावरण निर्माण झाले.सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मंडळाने आदर्श घालून दिला आहे.या उपक्रमात निखील गुंडमवार,आयूष न्यालेवार, शिवम कार्लावार,रितेश पोटावी,वेदांत कोवे आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!