Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास मिळणार भरपाई.. - रस्त्याचे...

आता खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास मिळणार भरपाई.. – रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारासह स्थानिक नागरी संस्था राहणार जबाबदार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात दरदिवशी लाखो नागरिकांना खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे जीव गमावावा लागतो आहे.रस्त्यांची दयनीय अवस्था ही निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यानेच होत आहे.यात बांधकाम कंत्राटदार ते स्थानिक संस्था संगनमत करून लोकांच्या जीवाशी खेळतांना दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांना चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते मिळण्याचा हक्क असून सेवेत कसूर झाल्यास,तो नागरिकांच्या संविधानाच्या कलम २१ अंतर्गत असलेल्या जीवन जगण्याच्या हक्काचे उल्लंघन करणे आहे.कंत्राटदार आणि रस्ते देखभालीची जबाबदारी असलेल्या नागरी संस्थांना आता अशा मृत्यू आणि दुखापतींसाठी जबाबदार धरले जाणार असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने दिला आहे.तत्कालीन न्यायमूर्ती जी.एस.पटेल यांनी २०१३ मध्ये मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणारे पत्र लिहिल्यानंतर न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या एका जनहित याचिकेवर सदरचा निर्णय दिला आहे.खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास,त्याला रस्त्यांचे बांधकाम करणारा कंत्राटदार(ठेकेदार)आणि स्थानिक नागरी संस्था जबाबदार असेल.तसेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सहा लाख तर जखमी झालेल्या व्यक्तीला ५० हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई द्यावी लागेल,असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.नुकसान भरपाई नाकारल्यास, नागरिकांच्या सुरक्षित रस्त्यांच्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष केल्यासारखे होईल,ज्या हक्काचे गंभीर उल्लंघन झाले आहे,अशा स्पष्ट शब्दांत खंडपीठाने सरकारी यंत्रणांवर ताशेरे ओढले.खंडपीठाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि म्हाडा, एमएसआरडीसी,सिडको अशा इतर नियोजन प्राधिकरणांना खड्ड्यांमुळे अपघात झालेल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचा आदेश दिला.
सदरची भरपाई पीडितांना मिळू शकणाऱ्या इतर कोणत्याही कायदेशीर उपायांव्यतिरिक्त असेल.तसेच, भरपाई देणाऱ्या प्राधिकरणाने ती रक्कम खड्ड्याला जबाबदार असलेल्या कंत्राटदार किंवा अधिकाऱ्याकडून वसूल करावी,असाही आदेश दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!