Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीअन् वनरक्षकच निघाला चोराचा साथीदार; वनरक्षक तकडाफडकी निलंबित..

अन् वनरक्षकच निघाला चोराचा साथीदार; वनरक्षक तकडाफडकी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सागवन लाकडाची चोरी करून वाहतूक केली जात असतांना वनकर्मचाऱ्यांनी वाहनासह चोरास वनउपज तपासणी नाक्यावर रंगेहाथ पकडले. पकडल्यानंतर चौकशी झाली,चौकशीत सागवन लाकूड चोरट्याने माझा साथीदार कुणी दुसरा नसून चक्क तुमच्याच खात्यातील वनरक्षक असल्याचे सांगितल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली.प्रकरणी चोराचे साथीदार असलेल्या वनरक्षकास काल बुधवारी तकडाफडकी निलंबित केले आहे.वनविकास महामंडळाचे(एफडीसीएम विभाग)वनरक्षक जितेंद्र धर्मराव मडावी असे निलंबित करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.तर संदीप दामोधर मडावी वय ३४ वर्षे,रा.कन्हाळगाव,ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून सदरची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्यावर घडली होती.
सिरोंचा तालुक्याच्या चिंतलपल्ली वनउपज तपासणी नाक्यावर १ ऑक्टोंबर रोजी एमएच ३४ एबी ५४८४ क्रमांकाच्या मालवाहू जीपमधून सागवन लाकडाचे पाच नग वन कर्मचाऱ्यांनी जप्त केले होते.त्यावेळेस आरोपी संदीप मडावी यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ ऑक्टोंबरपर्यंत वनकोठडी सुनावली होती.त्यानुसार चौकशीत त्याने तस्करीसाठी वापरलेले ट्रॅक्टर,दुचाकी,दोन चेनसों मशीन आणि लोखंडी साखळी जप्त करण्यात आली.वनविकास महामंडळाच्या कोप्पेला नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-२३३ मधून सागवान लाकूड तोडल्याचे आरोपीने कबूल केले.हे सागवान महादेवपूर येथील सुधाकर दशरथम चिर्लावंचा याला विक्री करण्यासाठी नेले जात होते,अशी कबुली आरोपीने दिली.नंतर पुन्हा चौकशी केली असता आरोपीने वनविकास महामंडळाचे वनरक्षक जितेंद्र धर्मराव मडावी यांचा चोरीत सहभाग असल्याचे सांगितल्याने वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चोराचे साथीदार असलेल्या जितेंद्र मडावी यास तात्काळ निलंबित केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!