- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादेवेळी घरात राहून वा गावात फिरून-फिरून ‘तोच बोवा येतो अन् तोच बोवा जातो’, असे होत असल्याने आता काय करावे?म्हणून जीव कंटाळवाणे झाल्यासारखे वाटते.त्यामुळे अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात.अश्याच प्रकारे नाशिक शहराच्या जेल रोडवरील शिवाजीनगर परिसरात एका ५८ वर्षीय व्यक्तीला घरी राहून कंटाळा आला. कंटाळा आल्याने त्याला काही सुचेनासे झाले.आता काय करावे म्हणून त्याने चक्क आपल्या ८० वर्षीय वृद्ध आईचा गळा दाबून हत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारच्या रात्री घडली.पठ्ठा एवढ्यावरच थांबला नाही तर स्वतःच पोलीस ठाण्यात गेला अन् पोलिसांना सांगू लागला की,मला कंटाळा म्हणजे बोर मारत होते म्हणून मी माझ्या आईचा गळा दाबला आणि त्यात ती मरण पावली,असे म्हणताच पोलीसही चक्रावून गेले आणि त्याच्याकडे टक लावून बघतच राहिले. त्यानुसार पोलिसांनी त्याला तिथेच ताब्यात घेतले व त्याच्या घरी पोहचून घराची झाडाझडती घेतली असता खरोखरच त्याच्या वृद्ध आईचा मृतदेह आढळून आला. प्रकरणी नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये अरविंद मुरलीधर पाटील वय ५८ वर्षे याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तर ८० वर्षीय वृद्ध त्याची आई यशोदाबाई मुरलीधर पाटील हीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

