उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या,सोमवार १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोंबर २०२५ रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील.१३ ऑक्टोंबर २०२५ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.त्यावर १४ ते १७ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहेत.त्याचबरोबर राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींची प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी येत्या,बुधवार ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे.त्यावर १३ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत तारीख जाहीर..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

