Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीपदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर.. - पात्र पदवीधारकांनी...

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर.. – पात्र पदवीधारकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन.. – सर्वांनाच करावे लागणार नव्याने अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.१ नोव्हेंबर,२०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.या कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ (Form18)भरून अर्ज करण्याचे आवाहन पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
या  कार्यक्रमाची सुरुवात आज,मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ पासून जाहीर सूचना प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.मतदार नोंदणीसाठी नमुना १८ भरणे आवश्यक असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक-६ नोव्हेंबर,२०२५ पर्यंत आहे.अर्ज स्वीकारल्यानंतर हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी २५ नोव्हेंबर २०२५  रोजी होईल.याच दिवसापासून दावे व हरकती स्वीकारण्यास सुरुवात होईल,ज्याची अंतिम मुदत १० डिसेंबर,२०२५ आहे.दावे व हरकतींवर २५ डिसेंबर २०२५ पर्यंत निर्णय घेऊन पुरवणी यादी तयार केली जाईल.मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ३० डिसेंबर,२०२५ रोजी होणार आहे.
नाव नोंदणीसाठी आवश्यक पात्रता आणि नियम👇
 
नागपूर पदवीधर मतदार संघात मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
शैक्षणिक पात्रता: अर्जदाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवी परीक्षा किंवा तत्सम समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
पदवीची वेळ मर्यादा: पदवी परीक्षा अर्हता दिनांकाच्या (०१/११/२०२५) तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली असावी.
कालावधीची गणना: तीन वर्षांच्या कालावधीसाठी विद्यापीठाने निकाल जाहीर/प्रसिध्द केल्याचा दिनांक गृहीत धरला जाईल,दीक्षांत समारंभाची तारीख नाही.
निवासी अट: मतदाराचे नागपूर पदवीधर मतदार संघात सर्वसाधारण रहिवास असावे आणि तो भारताचा नागरिक असावा.
नवीन अर्ज अनिवार्य: जरी तुमचे नाव सन २०२० च्या मतदार यादीत समाविष्ट असले तरी,२०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार होत असल्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया👇
अर्ज नमुना: पदवीधर मतदारसंघाकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी विहित नमुना १८ मध्ये अर्ज दाखल करायचा आहे.
अर्ज कोठे सादर करावा: नमुना १८ चा दावा/अर्ज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय,तहसिल कार्यालय येथे नियुक्त केलेल्या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे करता येईल.
टपाल सुविधा: पदवीधर मतदार टपालाद्वारे नमुना १८ आवश्यक साक्षांकित केलेल्या कागदपत्रांसह सादर करू शकतो.
अपवाद: गठ्ठा पध्दतीने (मोठ्या संख्येने)नमुना १८ अर्ज वैयक्तिकरित्या किंवा टपालाद्वारे,BLA द्वारे अथवा राजकीय पक्ष यांना सादर करता/स्वीकृत केला जाणार नाही.तथापि,विभाग प्रमुख त्यांचे अधिनस्थ पात्र पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांचे नमुना १८ चे दावे एकत्रित सादर करू शकतात.तसेच, कुटुंबातील व्यक्ती त्याच्या कुटुंबातील पात्र पदवीधर मतदाराचा दावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल करू शकतो,परंतु यासाठी दोघांचा रहिवास पत्ता सारखा असणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे👇
दाव्यासोबत खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक राहील:
विद्यापीठाने निर्गमित केलेली पदवी (Degree),किंवा
सरकारी दप्तरी पदवीबाबतची नोंद,किंवा
विद्यापीठाने पदवीधारण केल्याबाबत निर्गमित केलेले नोंदणी कार्ड,किंवा
पदवीच्या अंतिम वर्ष उत्तीर्ण केलेली मूळ गुणपत्रिका.
नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीकरीता विभागीय आयुक्त,नागपूर हे मतदार नोंदणी अधिकारी आहेत.गडचिरोली जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली व उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी विहित नमुना-१८ अर्ज आवश्यक पुराव्यांसह ६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत दाखल करून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
  • जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!