- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.त्यानुसार देशातील नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. अश्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळत जीवंत असलेले सर्व नक्षलवादी शरण आले तर त्यांना सरकारी अभय योजनेचा लाभ दिला जाणार,पण शरण आले नाही तर त्यांना मरावे लागेल,अश्या कडक शब्दांत त्यांनी नक्षली संघटनेला खडसावले आहे.डाव्या पक्षांनीच डाव्या अतिरेकी विचारांना वैचारिक बळ दिले.समाजात वावरणाऱ्या लोकांनीच या विचारांचे समर्थन केले. नक्षलवादी हिंसाचार हा अपुऱ्या विकासाशी संबंधित नाही.याउलट रक्तरंजित दहशतवादामुळेच देशातील अनेक भागांमध्ये काही दशकांपासून विकास पोहोचला नाही.जोपर्यंत समाजातूनच माओवादाला मिळणारे वैचारिक समर्थन,कायदेशीर साह्य आणि आर्थिक मदत रोखली जात नाही,तोपर्यंत माओवाद संपुष्टात येणार नाही; असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.मागील काही महिन्यांत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले जात आहेत.त्याचबरोबर बरेच नक्षलवादी हिंसा सोडून शरण येत आहेत.अलिकडेच नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी काही जणांनी शरणागती पत्करली आहे.यामुळे नक्षलवाद्यांची स्थिती कमकुवत होत आहे.या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधी प्रस्ताव सादर केला आहे.पण,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.त्यामुळे ‘एकतर शरण अन्यथा मरण’ अशी अवस्था नक्षलवाद्यांची होणार आहे.
- Advertisement -

