- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत तब्बल तीनदा स्वस्त करण्यात आली आहे.अश्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मंगळवार ८ एप्रिल २०२५ पासून ५० रुपयांची जी वाढ करण्यात आली आहे,ती तशीच जैसे थे..ठेवण्यात आली असल्याने व्यावसायिकांना दाणा तर सर्वसामान्यांना चुना,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.आज,सोमवार १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ५१.५० रुपयांची कपात केली आहे.जुलै महिन्यात ५८.५० रुपये तर मागील महिन्याच्या ऑगस्टमध्ये ३३.५० रुपयांची कपात झाल्यानंतर आज ५१.५० रुपयांनी सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला आहे.महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे दर ठरविण्यात येतात. मात्र,१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर,भंडा रा,गोंदिया व जवळपासच्या जिल्ह्यात १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ९१८ रुपये मोजावे लागत आहेत.त्यातच वैयक्तिक सिलेंडरची इनमिन-सव्वातीन रुपये सबसिडी जमा होत आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून ९१८ रुपये मोजा व केवळ ४२ रुपये ९३ पैसे सबसिडी घ्या,असा चुना लावल्या जात आहे.गेल्या दशकात घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनची संख्या दुप्पट झाली असून एप्रिल २०२५ पर्यंत ती सुमारे ३३ कोटींवर पोहोचली आहे.व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने याचा थेट फायदा केवळ रेस्टॉरंट्स,हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांना होणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन दरमहा गॅस दरांचा आढावा घेण्यात येतो.दरम्यान, मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर ३०० रुपये सबसिडी (अनुदान)जाहीर केले आहे.सदरची सबसिडी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी लागू असणार आहे.
- Advertisement -

