- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे.भामरागड, अहेरी,चामोर्शी व इतर तालुक्यात आज दिवसभर कोसळधारा सुरू होत्या.नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन लगतची गावे पाण्याच्या विळख्यात सापडू लागली आहेत.अश्यातच आज,मंगळवार १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास भामरागड शहरातील नागरिकांच्या वस्त्यांत तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आहे. पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या जीवनावश्यक साहित्यांचे नुकसान झाले आहे.आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अलर्ट मोडवर येत नागरिकांच्या मदतीला धावून गेले.त्यातच सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील तब्बल १३ मार्ग पुरामुळे बंद पडलेली आहेत.पुराचे पाणी पुलावरून वाहत असतांना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
- पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
- हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-१३० डी (पर्लकोटा नदी)ता.भामरागड
- अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला)ता.अहेरी
- तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-३८१(पोहार नदी)ता.चामोर्शी
- कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग-३७७(सती नदी)ता.कुरखेडा
- चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-५३ स्थानिक नाला)ता.चामोर्शी
- कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-७(स्थानिक नाला) ता.कुरखेडा
- शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता प्रजिमा-१ ता. देसाईगंज
- कोकडी ते तुळशी रस्ता प्रजिमा-४९ ता. देसाईगंज
- कोंढाळा कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-४७ ता. देसाईगंज
- पोरला वडधा रस्ता प्रजिमा-७ ता.कुरखेडा
- भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-१७ (हळदीमाल नाला)
- हलवेर ते कोठी रस्ता इजीमा-२४ ता.भामरागड
- गडचिरोली चांडाळा गुरवळा रस्ता राज्यमार्ग-३७९ ता.गडचिरोली
- Advertisement -

