- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण होऊन शेतीचे नुकसान,घरांची पडझड,जनावरे तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याच्या मोठ्या घटना घडल्या असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलर्ट मोडवर येत त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.राज्यात तब्बल १४ लाख एकर पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अश्यातच राज्यातील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.मुंबईतील मिठी नदी धोका पातळीवर गेली असल्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले असल्याचेही त्यांनी सांगितले.अलीकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने सध्या स्थितीत ज्या जिल्ह्यात शेती,घरे,जनावरे व इतर नुकसान किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय,अश्यांना मदत करण्याचे सर्व अधिकार हे त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना तात्काळ मदत करू शकतात.त्यांना थेट पैसे देण्याचेही अधिकार दिलेले आहे.त्यामुळे तिथे अडचण येणार नाही.शेती संदर्भात देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.मुंबईतील नागरिकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना वर्क फॉर्म होम देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंतची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असली तरी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि टायफाइड असल्यामुळे उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

