Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीआगारात उभ्या असलेल्या प्रवाश्यांना बसची धडक; चार प्रवासी जखमी.. - गडचिरोली बस...

आगारात उभ्या असलेल्या प्रवाश्यांना बसची धडक; चार प्रवासी जखमी.. – गडचिरोली बस आगारातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहराच्या मुख्य बसस्थानक आगारात बसची वाट पाहण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाश्यांना बसने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची घटना आज,रविवार १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.उर्मिला चनेकार वय ५५ वर्षे,निर्मला बाबनवाडे वय ५२ वर्षे,अविक बाबनवाडे वय ३ वर्षे,तृप्ती चनेकार वय १४ वर्षे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार,गडचिरोली आगारातून एमएच ०७ सी ९०७७ क्रमांकाची बस आज रविवारी दुपारच्या सुमारास आरमोरी-देलोडा मार्गावर धावण्यासाठी  बस फलाटावर उभी होणार होती.बस चालक बंडू खांडरे वय ५६ वर्षे रा.गडचिरोली यांनी फलाटावर बस लावण्याचा प्रयत्न केला असता धावत्या बसचे ब्रेक न लागल्याने बस अनियंत्रित झाली.त्यामुळे बसची वाट पाहत असलेल्या चार प्रवाशांना बसची धडक बसली. बसची धडक बसताच आगारातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली.अश्यातच वेळ वाया न घालविता जखमींच्या मदतीला गडचिरोली शिवसेना युवासेनेचे(उबाठा गट)पवन गेडाम यांचेसह तालुका प्रमुख कुणाल कोवे, शहर प्रमुख पप्पू शेख यांनी तत्परता दाखवत चारही जखमींना आपल्या खाजगी वाहनाने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.चारही जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात नेत तपासणी अहवालानुसार बस चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!