Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयंदा राख्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ..!

यंदा राख्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण.मात्र,यंदा भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या राख्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.तरीही रक्षाबंधननिमित्त बाजारपेठा गर्दीने फुलल्या असून भावाला आवडेल अशी राखी घेण्यासाठी बहिणींची बाजारात लगबग सुरू आहे.दुसरीकडे युवावर्ग आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करतांना दिसत आहेत.रक्षाबंधनाचा सण आज,शनिवार ९ ऑगस्ट रोजी असून गावगाड्यात तसेच बाजारपेठेत आकर्षक राख्यांची भर दिसून येत आहे. काही बहिणींनी भावांना राख्या पोस्टाने पाठवल्या आहेत.पूर्वी पाच रुपये डझनप्रमाणे मिळणाऱ्या देवराख्या आता सात ते आठ रुपयांना मिळत आहेत.बाजारात ५ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या असून ५० ते १०० रुपयांच्या राख्यांची जास्त विक्री होत आहे. बाजारात लहान राख्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. राखीसाठी लागणारे रेशीम,कुंदन व मजुरीत वाढ झाल्याने यंदा राख्यांच्या दरात आणखी १० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या,छोटा भीम,डोरेमॉन,मोटू पतलू, श्रीगणेशा,श्रीकृष्ण अशा राख्यांची विक्री सुरू आहे. कुंदन वर्क असलेल्या साध्या राख्यांना अधिक मागणी असून लायटिंग,लाकडी,पपेट,कडा राखीसह पारंपरिक देव राख्याही बाजारात उपलब्ध आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!