Tuesday, August 25, 2026
Homeनागपूरवर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला मिळाले तीन कोटी रुपये.. - देशाचे सरन्यायाधीश...

वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला मिळाले तीन कोटी रुपये.. – देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घरी जाऊन दिल्या शुभेच्छा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरची १९ वर्षीय कन्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळ स्पर्धेत देशाचे नाव जगभरात उंचावले आहे.अश्यातच आज,शनिवार २ ऑगस्ट रोजी ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य ‘नागरी सन्मान सोहळा’ नागपूर येथे संपन्न झाला.नागपूरमधील या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे,राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे,आमदार डॉ.परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते.राज्य सरकारच्यावतीने नागपूरकन्या आणि महाराष्ट्रकन्या म्हणून दिव्याचा सत्कार करत तिला तीन कोटी रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले.यावेळी,दिव्यामुळे महाराष्ट्राची,देशाची मान जगभरात उंचावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे,असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले.पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की,दिव्याकडून सर्वांना प्रेरणा मिळाली,यासाठी तिचा नागरी सत्कार करण्याचे आयोजन केले.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुद्धीबळ विश्व विजेती दिव्या देशमुख हिच्या नागपूरमधील शंकरनगर येथील घरी जाऊन तिला शुभेच्छा देत शाबासकी दिली.आमचे तीन पिढ्यापासूनचे कौटुंबिक नाते आहे,दिव्याचा विजय हा कौटुंबिक आनंदाचा क्षण आहे,अशी भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केली.दिव्याने यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!