Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीअद्याप हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद; पहा पूर परिस्थिती संदर्भात अहवाल..!

अद्याप हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद; पहा पूर परिस्थिती संदर्भात अहवाल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात अद्याप पावसाने विश्रांती घेतल्याने पुरामुळे बंद असलेले मार्ग खुले झाले आहेत.अश्यातच आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१३० डी वरील भामरागड पर्लकोटा  वाहतुकीचा पूल पाण्याखाली असल्याने सद्यस्थितीत हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद आहे.पुलावरून पाणी वाहत असतांना जीव धोक्यात घालून प्रवास करू नये,असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
  • पूर परिस्थिती संदर्भातील अहवाल👇
(प्रमुख धरण/नद्यांमधील विसर्ग व इशारा आज,बुधवार ३० जुलै सकाळी ११ वाजेपर्यंत)
  • गोसीखुर्द प्रकल्प(वैनगंगा नदी)१८०८ क्यूमेक्स (०.६४ लक्ष क्युसेक्स)विसर्ग नियंत्रणात आहे.
  • चिचडोह बॅरेज (वैनगंगा नदी)४८६४ क्यूमेक्स (१.७२ लक्ष क्युसेक्स)विसर्ग नियंत्रणात असून पाणी पातळी FRL च्या खाली आहे.
  • श्रीपदा येलमपल्ली प्रकल्प (गोदावरी नदी)दरवाजे बंद आहेत.
  • लक्ष्मी बॅरेज, मेडीगड्डा (गोदावरी नदी)९९६७ क्युमेक्स (३.५२ लक्ष क्युसेक्स)विसर्ग नियंत्रणात असून पाणी पातळी FRLच्या खाली आहे.
  • साखरा वडसा (वैनगंगा नदी)२१०.२५ मी.इशारा पातळीच्या खाली आहे
  • आष्टी (वैनगंगा नदी)१४७.७६ मी.इशारा पातळीच्या खाली आहे
  • सिरपूर टाऊन (वर्धा नदी)१५४.३५ मी.इशारा पातळीच्या खाली आहे
  • अहेरी गुडम ब्रिज (प्राणहिता नदी)११६.६१ मी.इशारा पातळीच्या खाली आहे
  • कालेश्वरम (गोदावरी नदी)९९.९६ मी.इशारा पातळीच्या खाली आहे
  • चिंदनार (इंद्रावती नदी)३३२.५४ मी.इशारा पातळीच्या खाली आहे
  • पात्तागुडम (इंद्रावती नदी)९२.२३ मी.इशारा पातळीच्या खाली आहे
  •  इशारा/आवाहन👇
भारतीय हवामान विभागाचे नागपूर,हैद्राबाद,रायपूर व भोपाल केंद्राचे २९ जुलै २०२५ रोजीचे पर्जन्यमान संदेशानुसार गोदावरी खोऱ्यातील काही भागात हलका ते मुसळधार स्वरुपाच्या पर्जन्यमानाचे संकेत दिलेले आहे.गडचिरोली जिल्ह्यात आज,बुधवार ३० जुलै करीता बहुदा सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.गोसीखुर्द धरणातून सध्या विसर्ग कमी करण्यात आलेला आहे.मागिल ४ ते ५ दिवसापासून जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या असलेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करु नये.नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतांना कोणत्याही परिस्थितीत वाहने क्रॉस करु नये.पूर परिस्थिती दरम्यान कृपया नदीकाठी/तलावाचे ठिकाणी जाऊ नये,सेल्फीचा मोह करु नये,पूरामध्ये मासे पकडायला जाऊ नये,पूरामध्ये जनावरांना धुवायला/पोहायला अथवा कपडे धुवायला जाऊ नये.अतितातडीचे कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये,असे आवाहन करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!