Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोली५०० कोटीच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खंडन..

५०० कोटीच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खंडन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात नक्षलवाद कमी होऊ लागताच बाहेरच्या तसेच कमी अनुभव असलेल्या कंत्राटदारास ५०० कोटींची कामे देण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी घातल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला.याबाबत काल,सोमवारी २८ जुलै रोजी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात एकवटलेल्या कंत्राटदारांनी न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला.५०० कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रियेतील कामे मर्जीतल्यांना देण्यासाठी जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात यापूर्वी कार्यरत असलेला सेवानिवृत्त अधिकारी सक्रिय झाल्याचा दावा कंत्राटदारांनी केला आहे.जे की,जिल्ह्यातील ज्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे.असा आरोप कंत्राटदार संघटनेने काल सोमवारी केला आणि आज,मंगळवार २९ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे खंडन केले.जिल्ह्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेसंदर्भात माध्यमातून आलेल्या आरोपांचे खंडन करत निविदा प्रक्रिया शासनाच्या वेळोवेळी प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार केल्या जात असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आंतरराज्य पूल जोडणी आणि वाढत्या उद्योगांमुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अलीकडील काळात झालेल्या बंधाऱ्यांच्या कामांमुळे पुराची पातळी वाढली असून, अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.या समस्यांवर उपाय म्हणून,वाहतूक गणनेनुसार अवजड वाहतुकीसाठी रस्त्यांचे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत.या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने सिमेंट-काँक्रीट रस्त्यांचा समावेश आहे. पूर्वी ‘सबमर्सिबल’ म्हणून डिझाइन केलेले पूल आता ‘हाय लेव्हल’ म्हणून बांधणे आवश्यक झाले आहे. त्यानुसार,पुलांचे संकल्पचित्र तयार करून अधीक्षक अभियंता,संकल्पचित्र मुंबई यांच्याकडून पाहणी करून मंजूर केले जातात.कामांची अंदाजपत्रके तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यांकडून तांत्रिक मान्यता घेतली जाते.ड्राफ्ट टेंडर पेपर तयार करून मुख्य अभियंता त्यांची मंजुरी देतात. शासन निर्णय,दिनांक-२५ ऑक्टोंबर २०१९ मधील सुधारित सूचनेनुसार,कामाचा अनुभव,अपेक्षित मशिनरी,ऑनलाइन बिड कॅपॅसिटी आणि मनुष्यबळ यासंबंधीची माहिती निविदेमध्ये कंत्राटदारांकडून मागवली जाते.
निविदा ऑनलाइन असतांना,मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली प्री-टेंडर कॉन्फरन्स आयोजित केली जाते.कंत्राटदारांचे काही आक्षेप असल्यास,त्यांचे समर्थन सीएसडी (CSD) द्वारे ऑनलाइन प्रसिद्ध केले जाते.तसेच निविदा बंद झाल्यानंतरही,आर्थिक प्रस्तावाचा (फायनान्शीयल बिड) लिफाफा उघडण्यापूर्वी एखाद्या कंत्राटदाराची कागदपत्रे कमी आढळल्यास ‘शॉर्टफॉल लेटर’ देऊन कागदपत्रांची मागणी केली जाते,ज्यामुळे कंत्राटदारांना त्यांची कागदपत्रे सादर करण्याची पुरेशी संधी मिळते.
कार्यकारी अभियंता हे निविदा बोलावण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत आणि वरील सर्व कार्यवाही त्यांच्या अधिकारक्षेत्रात येते.अश्यातच माध्यमातून प्रसिद्ध वृत्ताप्रमाणे,सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने ५०० कोटींची कामे मिळवण्यासाठी निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा आरोप योग्य नाही,असे कार्यालयाचे मत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी म्हटले आहे.काल,सोमवारी २८ जुलै २०२५ रोजी सर्व कंत्राटदारांनी मंडळ कार्यालयात येऊन त्यांचे मुद्दे मांडले होते आणि त्या सर्व मुद्द्यांबाबत शासननिर्णयसानुसार त्यांना कार्यवाहीची माहिती देण्यात आली.त्यामुळे अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही,हे म्हणणे योग्य नाही.तसेच कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकाबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली असून,उपलब्ध निधीनुसार कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत देयके प्रदान केली जात असल्याचेही बांधकाम विभागाच्या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!